मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : भैरेववाडी येथे २ कोटींच्या निधीतून सांस्कृतिक हॉलच्या स्लॅब कामाचा शुभारंभ करण्यात आला. माझ्या राजकीय व सामाजिक प्रवासात मराठा समाजाने नेहमीच साथ दिली आहे,ते मी कधीही विसरणार नाही,समाजातील तरुणांनी…

कोल्हापुरी चप्पल व कारागिरांना योग्य सन्मान मिळवून देईन : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : इटली येथील आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये प्रसिद्ध ब्रँड प्राडा यांनी सादर केलेले सँडल्स हे आपल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पलेची सरळ नक्कल आहेत. ही चप्पल लाखोंच्या किमतीत विकली जात आहे. मात्र…

कोल्हापुरात प्रलंबित आयटी पार्कच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे नाम.ॲड.आशिष शेलार यांना निवेदन

कोल्हापूर : जगातील आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीमध्ये आयटी क्षेत्राचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. कोल्हापुरात कौशल्यवान मनुष्यबळ आणि भौगोलिकदृष्ट्या चांगले स्थान असल्याने येथे एक प्रमुख आयटी हब निर्माण होऊ शकते.…

शिरोली येथे विवाहित महिलेची आत्महत्या

कुंभोज (विनोद शिंगे) पुलाची शिरोली येथील सौ. स्वाती अनिल कदम या महिलेने भाडोत्री घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली की घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. अनिल कदम हे विलास नगर…

सरकारच्या विरोधात 10 तारखेला सांगली पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : अलमट्टी धरण उंचीवाढ समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीमध्ये आमदार अरूणआण्णा लाड, माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील उपस्थितीत होते. अलमट्टी धरणाची उंची…

शक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची ऑनलाईन राज्यव्यापी बैठक

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज गुरुवारी 26/06/25 रोजी सायंकाळी  राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक…

शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल..

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. मंत्री हसन…

‘गोकुळ’ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात छत्रपती राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १५१ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते, माजी चेअरमन अरुण डोंगळे व संचालक…

कोल्हापूरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, इटलीतील फॅशन शो मध्ये विनापरवाना कोल्हापूरी चप्पलची नक्कल केल्याबद्दल कारवाई मागणी

कोल्हापूर:कोल्हापूरी चप्पलची परस्पर नक्कल होवू नये आणि स्थानिक चर्मकार कारागिरांच्या हक्कांवर गदा येवू नये, यासाठी आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इटलीतील मिलान शहरातील एका फॅशन शो मध्ये, प्राडा या आंतरराष्ट्रीय कंपनीने थेट कोल्हापूरी चप्पलची हुबेहुब डिझाईनची कॉपी केली आहे. वास्तविक २०१९ मध्येच भारत सरकारने कोल्हापूरी चप्पलला जिआय टॅग दिला आहे. त्यामुळे प्राडा कंपनीकडून कोल्हापूर चप्पलची कॉपी करून, स्थानिक कारागिरांवर अन्याय केला जातोय, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. २३ जूनला इटलीमध्ये झालेल्या एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर करण्यात आला. कोल्हापूरच्या चर्मकार कारागिरांसाठी हा एक सुखद धक्का होता. मात्र फॅशन शो आयोजकांनी कोल्हापूरी चप्पलचा असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा प्रदर्शनासाठी कायदेशीर परवानगी घेतली नाही. वास्तविक २०१९ मध्येच कोल्हापूरी चप्पलला  जिओ टॅगींग करून, एकप्रकारे कोल्हापूरी चप्पल बॅ्रँडचे आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रेशन झाले आहे. अशा परिस्थितीत आज कोल्हापुरातील काही चर्मकार कारागिरांना घेवून, युवा नेते कृष्णराज महाडिक  यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूरी चप्पल ही कोल्हापूरची आणि महाराष्ट्राची ओळख आहे. या चप्पलला भारत सरकारनं जिआय टॅग दिल्याने, त्याचे उत्पादन ठराविक क्षेत्रात नोंदणीकृत कारागिरांकडूनच होवू शकते. अशा परिस्थितीत प्राडा या कंपनीने इटलीतील फॅशन शो मध्ये कोल्हापूरी चप्पल सारखीच हुबेहुब डिझाईनची चप्पल सादर केली आणि  त्याचा मुळ उगम किंवा कारागिरांचा कसलाही उल्लेख केला नाही. त्यातून स्थानिक कारागिरांच्या हक्कांवर गदा आल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली. कृष्णराज महाडिक यांनी या विषयाचे महत्व आणि गांभीर्य मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडले. अशा पध्दतीने कोल्हापूरी चप्पलच्या कायदेशीर आणि मुलभूत हक्कांवर गदा येत असल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकार मार्फत कायदेशीर कारवाईसाठी पावलं उचलावीत आणि कोल्हापूरी चर्मकार बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी कृष्णराज महाडिक यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने याप्रश्‍नी  कायदेशीर पावले उचलणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांना याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी काय करता येईल, याबाबत माहिती घेण्यास सांगितले. कृष्णराज महाडिक यांनी, कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांना सोबत घेवून, या महत्वाच्या विषयावर थेट भुमिका मांडली. त्याबद्दल कोल्हापुरातील चर्मकार बांधवांनी कृष्णराज महाडिक यांचे आभार मानले आहेत.    

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर : राजस्थानमधील कोटा व पुण्याच्या धर्तीवर यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन केंद्र कागलमध्ये निर्माण करू, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व…

🤙 9921334545