कोल्हापूर जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर करावी – खा.धनंजय महाडिक 

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हयामध्ये गेल्या आठवडयाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता आहे.  पाऊस आणि थंड हवामान यांचा विपरीत परिणाम होऊन शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मुले पूराच्या पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करत शाळेला येतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हयातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलै दरम्यान सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार  धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्र दिले. कोल्हापूर जिल्हयात अतिवृष्टीमुळे  पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्हयातील ६० बंधारे पाण्याखाली गेले असून, अनेक मार्ग बंद झाले आहेत. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पाऊस आणि थंड हवा याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पूराच्या पाण्यातून वाट काढत, विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. पूरस्थितीमुळे शालेय  विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोचू नये, यासाठी खबरदारी म्हणून आजपासून तीन दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत  जिल्हयातील सर्व शाळांना सुट्टी दयावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांच्याकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; ‘काय’ झाली चर्चा !

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट…

‘हे’ सरकार हिंदुत्वद्रोही; संजय राऊत

मुंबई : ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले. उस्मानाबादचे धाराशिव केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पण हे तिन्हीही निर्णय रद्द…

स्व. राजेसाहेब यांचे समाजभिमुख विचार नगरपालिकेत नेण्यासाठी सज्य व्हा : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे हे समाजभिमुख,व पारदर्शी कारभार यासाठी आग्रही होते. त्यांचे हेच समाजभिमुख विचार व पारदर्शी कारभार नगरपालिकेत नेण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन…

पावसाची उसंत; 64 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने आज उसंत घेतली आहे. राधानगरी धरणात 151.43 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची…

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला ‘यामुळे’ स्थगिती

मुंबई : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे सरकार आले. शिंदे सरकार राज्यात येताच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या…

तृतीयपंथीयांच्या पाठीशी प्रशासन खंबीर, समाजानेही पुढे यावे : के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. समाजानेही पुढे येवून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले तसेच समाजात माणसाप्रमाणे त्यांना मानाचे स्थान…

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील महत्त्वाचे विभाग जसे पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये…

नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित

मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने याची आज घोषणा केली. १८ ऑगस्ट २०२२ रोजी या निवडणुका होणार होत्या, पण…

न्यू वाडदेच्या सरपंच सुनीता धडके अपात्र

कोल्हापूर : न्यू वाडदे (ता. करवीर) येथील सरपंच सुनीता धडके यांना आर्थिक लाभ घेतल्या प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सरपंच व सदस्य म्हणून यापुढे अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी दाखल करण्यात…

🤙 8080365706