नेव्हीनगरमध्ये हृदयद्रावक घटना; नौदल जवान, पत्नी आणि 2 मुलांचा मृत्यू

मुंबई:स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दक्षिण मुंबईतील नेव्हीनगर, कुलब्याचा परिसरात नौदलाच्या निवासस्थानात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एका नौदल जवानाच्या पत्नी आणि दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे

मृतांची नावे:

1.  पुरणमल शंभुलाल मेहरा (30) – नौदल जवान

2. अर्चना मेहरा(29) – पत्नी

3. दोन मुले – एक 2 वर्षांची मुलगी आणि 2 महिन्यांचा मुलगा

 

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जवानाने पत्नी आणि दोन्ही मुलांना विष देऊन नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. मात्र शवविच्छेदन आणि विषतज्ज्ञांच्या अहवालानंतरच खऱ्या कारणाचा उलगडा होणार आहे.

 

शनिवार, 16 ऑगस्ट रोजी जवानाशी संपर्क होत नसल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी शोध घेतला. कुलाब्यातील कुडाळी येथील निवासस्थानी नौदलाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी निवासस्थानाचा दरवाजा तोडला. आत प्रवेश केल्यानंतर अर्धवट मूर्छित अवस्थेत जवान आणि मृतावस्थेत पत्नी व दोन्ही मुले आढळून आली.

 

जवानाचा गळफासाने आणि पत्नी व मुलांचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सासरच्यांशी पैशावरून वाद, तणाव आणि घरगुती कारणांमुळे हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

नेव्हीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून विषाची बाटली आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

🤙 8080365706