कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात एसटीच्या चाकाखाली सापडून कर्मचारी ठार

कोल्हापूर:मध्यवर्ती बसस्थानकातील एसटी वर्कशॉपमध्ये रेम्पमध्ये काम करणारा कर्मचारी एसटीच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.  

 

 

पांडुरंग अण्णाप्पा चव्हाण (वय 56, रा. मादोले, ता. हातकणंगले) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते एसटीच्या वर्कशॉपमध्ये रेम्पमन म्हणून काम करत होते.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी  कर्तव्यावरून घरी परत येत असताना सकाळी 11 वाजता चालक सिकंदर मणेर हे एसटी वर्कशॉपमध्ये दुचाकीसाठी घेऊन जात होते. रेम्पवरून त्यांनी एसटी पुढे नेली असता, पुढच्या चाकाखाली पांडुरंग चव्हाण आले. त्यांच्या अंगावरूनच एसटीचे चाक गेल्यामुळे ते जागीच मृत्यू झाले.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे रेम्पवर इतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे मणेर यांनी एसटी थांबवली. मात्र, तोपर्यंत चव्हाण मृत झाले होते.

 

शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चालक सिकंदर मणेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🤙 8080365706