सांगली:स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे घडली.

मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मनोहर शामराव कांबळे (वय 45) असे निधन झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थी स्वातंत्र्यगीत सादर करत असताना कांबळे सर अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे कोकरूड आणि परिसरात हळहळ व्यक्त कली जात आहे.
