गोकुळ जागा वाटप जाहीर; शिरोळ, गडहिंग्लज, चंदगडला, संधी नाही

कोल्हापूर:‘गोकुळ’ दूध संघाच्या आगामी निवडणुकीत तालुकानिहाय जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. यंदा शिरोळ, चंदगड आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांना संचालकपदासाठी संधी मिळालेली नाही. तर शाहूवाडी, आजरा आणि गगनबावडा या तीन तालुक्यांसाठी मिळून फक्त एकच जागा देण्यात आली आहे. 

 

मागील निवडणुकीतील चिरांच्या तुलनेत यंदा करवीर तालुक्यात सर्वाधिक 6 जागा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर राधानगरीला 4, कागलला 3, पन्हाळा, हातकणंगले आणि भुदरगडला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत.

 

एकूण 24 संचालक पदांपैकी बहुतांश जागा मोठ्या तालुक्यांना गेल्याने लहान तालुक्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. शाहूवाडी, आजरा आणि गगनबावडा या डोंगराळ भागातील तालुक्यांना एकत्रित एकच जागा दिल्याने तेथील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

 

निवडणुकीच्या दृष्टीने तालुकानिहाय हे जागा वाटप महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे. उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी सर्वच गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

 

🤙 8080365706