कोल्हापूर : सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकादमी, विनयनगर येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे साहेब यांनी आज भेट दिली.

सन 1997 मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची भावना रुजविण्याचे कार्य सुरू आहे. शिक्षणासोबतच सैनिकी प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशसेवेसाठी सक्षम पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे.
अकादमीला भेट दिल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अकादमीतील शैक्षणिक व प्रशिक्षण उपक्रमांची माहिती घेतली. स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या विचारातून उभ्या राहिलेल्या या संस्थेचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी आमदार . अशोकराव माने, अकादमीचे कमांडंट कर्नल आर. बी. पाटील, प्राचार्य श्री. मिलिंद राजे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर कदम तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
