सरकारशी चर्चा होईपर्यंत उपोषण मागे नाही – सोनम वांगचुक

मुंबई : लडाखच्या हक्कांसाठी सुरू असले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण मंगळवारी 17 व्या दिवशी पोहोचले. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने चर्चेला सुरुवात केल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे क्लायमेट पॉलिसी ग्रुपने सांगितले.

 

 

 

वांगचुक यांनी सुरू केलेल्या या सत्याग्रहाला आता 17 दिवस पूर्ण झाले आहेत. तर या मागणीसाठी सुरू असलेल्या एकूण आंदोलनाचा आज 25 वा दिवस आहे. वांगचुक यांचे वजन आणि रक्तदाब कमी झाला असून प्रकृती खालावत असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिली.

 

राजकीय नेत्यांचा पाठिंबा

वांगचुक यांच्या प्रकृतीची आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी फोनवरून विचारपूस केली. तसेच शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही चिंता व्यक्त करत त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

 

सरकारने लडाखच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 

 

🤙 8080365706