कागल: कागल येथे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार समरजीतसिंह घाटगे आणि सदा साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पात्र ठरलेल्या 472 लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांच्या हस्ते मंजुरीपत्रे देण्यात आली. अनेक दिवसांपासून शासकीय मदतीची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसून आला.
यावेळी बोलताना समरजीतसिंह घाटगे म्हणाले, “राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नव्हेत. गरजू माणसापर्यंत शासनाची मदत पोहोचवणे हेच खरे राजकारण आहे. लाभार्थ्यांच्या डोळ्यातील समाधान पाहून आम्हाला काम करण्याची नवी ऊर्जा मिळते.”
शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
