सागवडेवाडीत राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या

कोल्हापूर :सांगवडेवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केली. श्रीकांत कृष्णात जाधव (वय ४९) असे मृताचे व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास श्रीकांत जाधव यांनी त्यांच्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतला. ही घटना नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ त्यांना खाली उतरवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणाची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

🤙 8080365706