मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथील शाहू महाराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन

कोल्हापूर:लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कागल शहरातील शाहू उद्यान येथे असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, कागल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सौरभ पाटील, श्रीनाथ समूहाचे अध्यक्ष चंद्रकांत गवळी, मुख्याधिकारी डॉ.अजय पाटणकर, कागल नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सतीश घाडगे, नगरसेवक नवल बोते, अमित पिष्टे, अर्जुन नाईक, अस्लम मुजावर, शहराध्यक्ष संजय चितारी, नवाज मुश्रीफ, अमर सनगर, भगवान कांबळे, गणेश कांबळे, विवेक लोटे, सुरजकुमार कामत, बंडा बारड, अजित निंबाळकर, बच्चन कांबळे तसेच नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.*

🤙 8080365706