गोकुळ, जिल्हा बँक निवडणूकीत आ. यड्रावकर मंत्री मुश्रीफांसोबत

कोल्हापूर:शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना साथ दिली आहे. राष्ट्रवादीच्या ठरावधारकांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामध्ये आमदार यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकरउपस्थित होते. त्यांनी गोकुळ, जिल्हा बँक निवडणुकीत आम्ही मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत राहणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

 

शिरोळ तालुक्याला गेली दहा वर्ष ‘गोकुळ’चे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे या तालुक्यातील दूध उत्पादकांसह दूध संस्थांचे प्रश्न सोडविताना अडचणी आल्या. मागील निवडणुकीत माजी संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांना हातकणंगलेसह

 

शिरोळचेही प्रतिनिधीत्व दिले. परंतु, ते आज तुमची कामे केली. ठराव का देत नाही, असे विचारत आहेत. मात्र, त्यांनी तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही संचालक झाला हे त्यांनी विसरू नये. यासाठीच आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिरोळ तालुक्यातील १७० दूध संस्थांचे ठराव मंत्री मुश्रीफ यांना दिल्याचे संजय पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

🤙 8080365706