कोल्हापूर : जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, आयुष विभाग राष्ट्रीय आयुष अभियान, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र – गोवा व माय भारत, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जुन रोजी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत, महासैनिक दरबार हॉल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिधी, जिल्हा प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यलयातील अधिकारी कर्मचारी, राष्ट्रीय खेळाडू, नागरिकांनी 21 जून रोजी सकाळी 6.45 वाजता, महासैनिक दरबार हॉल येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे करण्यात आले.
