कागल येथील वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

कोल्हापूर : कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू असून यामध्ये इयत्ता 7 वी च्या पुढे विद्यालयीन, महाविद्यालयीन व व्यावसाईक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणा-या गरजू विद्यार्थ्यासाठी (अनुसूचित जाती/अनुसुचित जमाती /विमुक्त जाती भटक्या जमाती/ इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग इत्यादी प्रवर्गातील) रिक्त जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. 

 

 

 

 

प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, जेवण, राहण्याची सोय, सुसज्ज ग्रंथालय, सभागृह, क्रिडांगण, संगणक कक्ष, मनोरंजन कक्ष, जिम इत्यादी सुविधा उपलब्ध असून वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, गणवेश भत्ता, सहल भत्ता व स्टेशनरी भत्ता इत्यादी सोयी सुविधा विनामुल्य असणार आहेत. तरी गरजू विद्यार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत प्रवेश अर्ज मोफत प्राप्त करुन घेवून आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज करावेत.

 

प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुलांचे शासकीय वसतिगृह, क// सांगाव रोड, कागल येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.

0000

🤙 8080365706