कोल्हापूर:
कलाकार महासंघ, महाराष्ट्र राज्य ही संघटना गेली २० वर्षे महाराष्ट्रतील कलाकार व इतर क्षेत्रातील मान्यवर यांना पुरस्कार देऊन सन्मान करत असते. यावर्षी *बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्यामुळे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे* यांची सहकार भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गारे, तालुका सर चिटणीस नरहरी वाकरेकर यांच्या उपस्थित देण्यात आले.
