फलोत्पादन अभियानांतर्गत 131 शेतकऱ्यांना 60 लाखांचे अनुदान मंजूर

कोल्हापूर : कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना 2026-27 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 131 शेतकऱ्यांच्या सुमारे 60.81 लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर प्राप्त अर्जांमधून ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी दिली.

 

 

 

 

योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी सर्वाधिक 70 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यासाठी 36.36 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मसाले पीक व औषधी वनस्पती लागवडीसाठी 22 लाभार्थ्यांना 6.01 लाख, विड मॅटसाठी 11 लाभार्थ्यांना 5.05 लाख, मधुमक्षीका वसाहटीसाठी 14 लाभार्थ्यांना 4.70 लाख, ड्रॅगन फ्रूट व अव्होकॅडो लागवडीसाठी 5 लाभार्थ्यांना 4.10 लाख, लहान मशरूम उत्पादन प्रकल्पासाठी 3 लाभार्थ्यांना 4 लाख आणि प्लास्टिक मल्चिंगसाठी 6 लाभार्थ्यांना 0.59 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

 

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे तातडीने पोर्टलवर अपलोड करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये 7/12 व 8-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक तसेच संबंधित घटकासाठीचे अधिकृत कोटेशन आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे.

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या आणि अद्याप अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in](https://mahadbt.maharashtra.gov.in पोर्टलवर जाऊन त्वरित अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा.

0000

🤙 8080365706