अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्यासाठीच्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल राजे समरजितसिंह घाटगे यांचा लाभार्थ्यांकडून सत्कार

कागल प्रतिनिधी :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परताव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची तरतूद करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल या योजनेतील लाभार्थ्यांच्यावतीने शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनच्या कार्यालयात सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 

 

 

 

मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परताव्याची महत्त्वपूर्ण योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रभावीपणे सुरू आहे. या योजनेमुळे अनेक मराठा तरुणांना उद्योग व्यवसायासाठी मोठा आधार मिळाला आहे. मात्र, व्याज परताव्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचा परतावा रखडला होता. त्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले होते.

यासंदर्भात काही लाभार्थ्यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन घाटगे यांनी या महामंडळासाठी भरीव निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी केली होती.नुकताच राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी शाहूचे संचालक सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक रणजित पाटील, नगरसेवक दीपक मगर, राजेंद्र जाधव, पांडुरंग जाधव,आतिश चव्हाण,उमेश तोडकर,मोहन हुजरे,विनायक मगदूम, विशाल पाडळकर आदी उपस्थित होते.

 

चौकट

समाजाच्या हितासाठी यापुढेही पाठपुरावा करत राहू-राजे समरजितसिंह घाटगे

“मराठा समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, स्वतःच्या पायावर उभे राहावेत आणि उद्योग-व्यवसायात प्रगती करावी, हीच आमची भूमिका आहे. या योजनेतून मराठा समाजातील तरुणांना कर्ज पुरवठ्यात आमची राजे बँक जिल्ह्यात अग्रस्थानी आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हजारो लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाच्या हितासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करत राहू,अशी ग्वाही यावेळी राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

 

 

🤙 8080365706