हातकणंगलेत राजकीय समीकरणांना कलाटणी विकासराव माने, कृष्णाजी मसुरकर यांचा शिंदे गटात प्रवेश; खा. धैर्यशील मानेंची ताकद वाढली

हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंदे 

हातकणंगले तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली आहे. माजी पंचायत समिती सदस्य विकासराव माने आणि माजी उपसरपंच डॉ कृष्णाजी मसुरकर यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे खासदार धैर्यशील माने यांचे तालुक्यातील राजकीय वजन वाढले आहे.

 

 

 

 

मुंबईत उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी समन्वयक झाकीर भालेदार उपस्थित होते.

 

पंचायत समिती समिती सभापती स्व. अशोकराव माने यांचा राजकीय वारसा विकासराव माने यांनी समर्थपणे जपला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते तटस्थ होते. त्यांच्या पत्नी दीप्ती माने या अंबपच्या उपक्रमशील सरपंच म्हणून कार्यरत आहेत. विकासराव माने यांचा प्रवेश शिंदे सेनेसाठी फायद्याचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

दुसरीकडे, डॉ कृष्णाजी मसुरकर हे पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात सक्रिय नेते आहेत. मसुरकर फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी महिला, युवक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.

 

या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश प्रातिनिधिक स्वरूपात असून यामुळे शिवसेना शिंदे गटाला ग्रामीण भागात चांगलाच आधार मिळाला आहे. आगामी काळात आणखी काही कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे

🤙 8080365706