कोल्हापूर : उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर यांच्या अधिनस्त गट क सर्वसाधारण बदली प्रक्रिया – 2026 ; ही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, यांच्या मार्गदर्शक सुचना व शासन निर्णयानुसार बदली समुपदेशन प्रक्रिया 16 मे रोजी प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,शेंडा पार्क येथे आयोजित करण्यात आली होती.

गट क सर्वसाधारण बदली 2026 प्रक्रिया ही- लिपिक संवर्ग (28), तांत्रिक संवर्ग (74), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (83), आरोग्य निरीक्षक (48), शुश्रूषा संवर्ग (137) अशा एकूण 370 कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. बदली समुपदेशन प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या पार पडल्याने कर्मचाऱ्यांनी व कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले.या बदली समुपदेशन प्रक्रियेकरीता राज्यस्तरावरून निरीक्षक म्हणून आरोग्य सेवा,प्रशासन राजेंद्र भालेराव,उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर तथा अध्यक्ष नागरी सेवा मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.दिलीप माने, डॉ सतीश सूर्यवंशी,प्रभारी मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा सदस्य सचिव नागरी सेवा मंडळ व डॉ.संजय रणवीर सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) कोल्हापूर तथा सदस्य नागरी सेवा मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडली .
ooooo
