कोल्हापूर:दीपावली सणा दरम्यान गल्लीबोळात किल्ले बनवले जातात. यानिमित्तानं छत्रपती शिवरायांचा इतिहास मुलांना वाचायला, ऐकायला मिळतो. कोल्हापुरात तालीम संस्थांच्या परिसरात भव्य प्रमाणात किल्ले उभारणी केली जाते. यावर्षी भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज भाजपा जिल्हा कार्यालय कोल्हापूर नागाळा पार्क या ठिकाणी संपन्न झाला. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या किल्ला स्पर्धेला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरातील तरुणांनी यंदा अप्रतिम किल्ल्यांची उभारणी केली होती.

यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत बुध्दी, युक्ती, चातुर्याच्या बळावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांचं वास्तुशास्त्र, सिंचन व्यवस्था, शेती पध्दती, प्राचीन युध्दकला यासह विविध बाबींची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी किल्ले स्पर्धा महत्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. तसेच पुढील वर्षी ५०० स्पर्धकांचा सहभाग असलेली जिल्हा पातळीवरील किल्ला स्पर्धा भाजपा कोल्हापूर कडून आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले किल्ला स्पर्धेमध्ये सर्व मंडळांनी अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे ही किल्ले स्पर्धा यशस्वीरित्या पार करण्यात भाजपा कोल्हापूर यशस्वी झाली. यानिमित्तानं इंजिनिअरिंगचा नमुना अनुभवता आल्याचे सुद्धा सांगितले.
भाजपा माजी प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले खासदार धनंजय महाडिक यांनी संसद खेलरत्न उपक्रमांतर्गत २२ क्रीडा स्पर्धांचं आयोजन केले होते. त्यातच या किल्ले स्पर्धांचा अंतर्भाव होता. यातून तरुणांना इतिहास जाणून घेण्याची चालना मिळाले आहे. सांसद खेल रत्न उपक्रमात जिल्ह्यात ४० हजार मुलांचा सहभाग होता. त्यामुळं क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचं काम झाले.
दरम्यान या स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून 50 हजार अनुक्रमे
1) संध्यामठ तरुण मंडळ
2) साठमारी तरुण मंडळ
द्वितीय क्रमांक विभागून 37500 अनुक्रमे
1) वीर संभाजी तरुण मंडळ भोसलेवाडी
2) मावळा ग्रुप गुरुवार पेठ
तृतीय क्रमांक विभागून 25000 अनुक्रमे
1) शिवगर्जना प्राचीन युद्ध कला संस्था
2) शिवनेरी तरुण मंडळ ठोंबरे मळा
उत्तेजनार्थं सर्वांना 5000
1 झीक जॅक मंडळ खासबाग
2 राधाकृष्ण तरुण मंडळ
3 नेताजी तरुण मंडळ
4 ओम शिवाजीनगर तरुण मंडळ राजेंद्र नगर
5 दत्त ग्रुप पायमल वसाहत
7 भोसले सायबर चौक
बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेच्या निकालासाठी
हिल रायडर्स संस्थेचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी परीक्षण केले यासाठी आप्पा लाड, विजय आगरवाल, सचिन सुराणा, राकेश गुन्देशा यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सरचिटणीस अमर साठे, विराज चिखलीकर, उपाध्यक्ष डॉक्टर राजवर्धन, भरत काळे, आप्पा लाड, विजय अग्रवाल, शैलेश पाटील, दीपक काटकर, अतुल चव्हाण, सयाजी आळवेकर, नगरसेवक प्रमोद देसाई, पल्लवी देसाई, दीपा काटकर, विजयसिंह देसाई, पूजा पवार, वैभव कुंभार, अभय तेंडुलकर, सुनील वाडकर, विश्वजीत पवार, अनिल कामत, महेश यादव, राजाराम नरके, मंडळ अध्यक्ष धीरज पाटील, रश्मी साळुंखे, सुनील पाटील, राजगणेश पोळ, संदीप कुंभार, मानसिंग पाटील, आसावरी जुगदार, अवधूत भाटे, संग्राम जरग, प्रशांत अवघडे, अक्षय निरोपेकर इ. पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
