कोल्हापूर: बाराव्या परीक्षेत नेहमी पहिल्या चार क्रमांकात स्थान असणाऱ्या कोल्हापूर विभागाच्या निकालात यंदा घट झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागाच्या निकालाची टक्केवारी यंदा ८९.९७ टक्के इतकी आहे. निकालाच्या टक्केवारीत राज्यात कोल्हापूर विभाग सहाव्या क्रमांकापर्यत घसरला. कोकण विभाग यंदाही ९४.१४टक्के गुण प्राप्त करत अव्वल स्थानावर राहिला. तर पुणे विभागाचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अमरावती विभाग असून तृतीय क्रमांकावर असून निकालाची टक्केवारी ९०.९२ टक्के इतकी आहे. नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी ९०.७२ टक्के इतका असून चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई विभाग पाचव्या स्थानी असून निकालाची टक्केवारी ९०.०८ टक्के इतकी आहे.
