गोकुळ शिरगाव: कॉलेजमधील विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या केआयटी कॉलेजमधील
निलंबित प्राध्यापक सौरभ संजय जोशी (वय ३०, रा. स्मृती अपार्टमेंट, बाबुजमाल दर्याजवळ, कोल्हापूर) याला सोमवारी पुन्हा अटक करण्यात आली. जोशी याचा काळवा जेलमधून पोलिसांनी ताबा घेतला.

न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली
पीडित कॉलेज युवतीने विनयभंग केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केल्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिसांनी प्रा. जोशी याला अटक केली होती. न्यायालयाने कोठडीत रवानगी केली होती. दरम्यानच्या काळात त्याच्या वर्तनामुळे मानसिक त्रास सोसावा लागलेल्या १२ विद्यार्थिनीनी करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, गोकुळ शिरगावच्या सहायक पोलिस निरीक्षक तबस्सुम मगदूम यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचला होता.
जोशी यांच्या वर्तनाविषयी तक्रारीसाठी विद्यार्थिनी स्वतःहून पुढे
जेलमधून घेतला ताबा
विनयभंगप्रकरणी व्याप्ती वाढली; विद्यार्थिनींकडून तक्रारींचा ओघ सुरू
आल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढविली आहे. सहा विद्यार्थिनीचा जबाब नोंदविला आहे. कॉलेजमधील बहुतांशी मुली सुट्टीसाठी गावी गेल्या आहेत, त्यांनीही तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जोशी याच्या वर्तनाबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत. या सर्व विद्यार्थिनींना साक्षीदार करण्यात येत असल्याचे मगदूम यांनी सांगितले.
निलंबित प्रा. जोशी याच्या न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन तपास अधिकारी तथा सहायक निरीक्षक मगदूम यांनी संशयिताचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश झाला. जोशी याचा कारागृहातून ताबा घेऊन त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दि. ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला आहे.
