कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्याचा मुद्दा गाजला. सर्वच नगरसेवक आणि नगरसेविका यांनी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर सभागृहाला धारेवर धरत अनेक मुद्दे उपस्थित केले.
यामध्ये युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव आणि नुतन नगरसेवक ऋतुराज राजेश क्षीरसागर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भूमिका मांडत एका वेगळ्या मात्र चांगल्या मुद्याला हात घातला.
ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी शहराला न झालेला पाणीपुरवठा याचे कारण म्हणजे बालिंगा पंपिग स्टेशनं मधील एक कॉईल खराब झाली आणि ती आपल्याकडे उपलब्ध नसल्याने ती बेळगाव मधून उपलब्ध करावी लागली. या प्रक्रियेत दोन ते तीन दिवसाचा कालावधी जातो, आणि त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना होतो. कोल्हापूर सारख्या सुधारलेल्या शहरात अशाप्रकारे पार्ट उपलब्ध नसणे हे दुर्दैवी असल्याचे मत मांडत अत्यावश्यक असलेले पार्टसची उपलब्धता ठेवण्याची व्यवस्था पाणीपुरवठा विभागाने करावी, अशी सूचना त्यांनी सभागृहात मांडून सभागृहाचे लक्ष वेधले…
