सत्तेच्या अहंकाराविरोधात महिलांनी एकजूट होऊन काँग्रेस आघाडीला मतदान करावे: आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने रुई मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेवारांच्या प्रचारार्थ अतिग्रे (हातकणंगले) येथे आयोजित महिला मेळावा आणि हळदी- कुंकु कार्यक्रमाला माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आ . सतेज पाटील यांनी भेट देऊन संबोधित केले. यावेळी माजी आमदार राजीव किसनराव आवळे उपस्थित होते.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई राजीव आवळे, नगरसेविका क्रांती आब्राहम आवळे, सरपंच पांडुरंग पाटील, सदस्य़ बाबासो पाटील, तानाजी पाटील, उमेदवार अँड राहूल राजीव आवळे, सौ. रोहीणी प्रकाश आदाण्णा, सौ. वेदिका विनय पाटील यांच्यासह शेकडो महिला- भगिनी उपस्थित होत्या.

यावेळी आमदार सतेज पाटील यांनीजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, बचत गट अशा मूलभूत प्रश्नांवर काँग्रेस पक्षाचे विशेष काम आहे. याचबरोबर समाजात बंधुभाव, एकोपा आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करा. सत्तेच्या अहंकाराविरोधात उभे राहून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन यावेळी भगिनींना केले.

 

🤙 8080365706