कोल्हापूर:जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस, शेतकरी संघटना व शिवसेना (उबाठा) आघाडीच्या शिरोळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ श्री दत्त महाराजांची पावन भुमी श्री क्षेत्र नृसिंहवाडी (शिरोळ) येथून करण्यात आला. आ.सतेज पाटील,माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. यावेळी श्री दत्त सहकार समुहाचे अध्यक्ष गणपतरावदादा पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी संजय चौगुले, मधुकर पाटील, वैभव उगले, शिरोळच्या नगराध्यक्ष योगिता कांबळे, रघुनाथ पाटील, अनंत धनवडे, सचिन शिंदे, विठ्ठल मोरे, स्वाती सासणे, विजय पाटील, अशोक कोळेकर, अर्चना धनवडे, तालुकाध्यक्ष दरगु गावडे, शेखर पाटील विश्वजीत कांबळे, नितीन बगे, जयदीप थोरात यांच्यासह सर्व नगरसेवक आणि उमेदवार उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या 34 जागांनी स्वाभिमानी जनता ठामपणे सत्ताधाऱ्यांविरोधात लढत असल्याचे सिद्ध केलं आहे. लोकशाहीत सत्तेचा सातबारा कुणाच्याही नावावर नाही. कोल्हापूरकर जिल्ह्याला न्याय, सन्मान आणि विकास देण्यासाठी येत्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, शेतकरी संघटना व शिवसेना (उबाठा) आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आ.सतेज पाटील यांनी उपस्थितांना केले.
