कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्र. क्र. ६ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभा पार पडली.
यावेळी आ.राजेश क्षीरसागर बोलताना म्हणाले,माझ्या राजकीय आणि सामाजिक जडण-घडणीत या भागाचे नेहमीच मोलाचे स्थान राहिले आहे, भागातील नागरिकांनी भरभरून प्रेम आणि भक्कम साथ दिल्याचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नसल्याची भावना व्यक्त केली.
तसेच या भागाला प्रामुख्याने भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येवर कायम स्वरूपी उपाय करण्यासाठी जागतिक बँक, महाराष्ट्र शासन आणि मित्रा संस्था यांच्या मार्फत ३८०० कोटींचा पूर नियंत्रण प्रकल्प कार्यान्वित होत असल्याचे सांगितले.
तसेच गेली अनेक वर्ष महानगरपालिकेत सत्ता भोगत असलेल्या आणि नेहमी वेगवेगळ्या टॅगलाईन देऊन भूलथापा मारणाऱ्यांच्या फसव्या अमिषाला बळी पडू नका, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार नंदकुमार मोरे,.शिला सोनुले,माधवी गवंडी, दिपा काटकर,उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे,.उदय भोसले, अंकुश निपाणीकर, रियाज बागवान, पिंटू काटकर, सतीश घरपणकर, .रामदास काटकर, माजी नगरसेवक उदय जगताप, .विराज चिखलीकर ,सुरेश सुतार, ज्ञानदेव कळके यांच्यासह मान्यवर, भागातील सर्व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपास्थित होते.
