मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गिरगाव–मिणचे खुर्द रस्ता मजबुतीकरण 

कोल्हापूर:मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गिरगाव ते मिणचे खुर्द या ७ किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभ मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत  पार पडला. या कामासाठी ₹८.९९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामविकासासाठी कटिबद्ध राहून दर्जेदार पायाभूत सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.असे मत मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य  कल्याणराव निकम,  नाथाजी पाटील (भाजप जिल्हाध्यक्ष)  नंदकुमार ढेंगे (संचालक गोकुळ दूध संघ),  मदन देसाई (मा.सभापती),  सुरेशनाना देसाई (मा. सभापती जिल्हा संघ),  आक्काताई नलवडे (मा. सभापती)  उमेश तेली (संचालक शरद सहकारी सूतगिरण),  विक्रम पाटील (संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष),  संदीप पाटील (शिवसेना उपतालुकाप्रमुख), अंकुश चव्हाण (संचालक तालुका संघ),  राजू देसाई (सरपंच हेडवडे),  साताप्पा धुरे (सरपंच फये), श्री. अशोक भांदीगरे (माजी सरपंच आकुर्डे),  शरद देसाई,  शंकर देसाई,  धनाजीराव देसाई,  उमाजी पाटील,  बाजीराव पाटील, अरविंद हरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706