महापालिकेत तुमचीच सत्ता, विरोधक म्हणून आम्ही प्रश्न विचारणारच! : आ. सतेज पाटील

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग 11 मध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारसभा घेतल्या. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत उमेदवार सचिन मांगले यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आ . सतेज पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रवी इंगवले, जयश्री सचिन चव्हाण, संदिप सरनाईक, यशोदी रविंद्र आवळे, राजेंद्र ठोंबरे, संपत जाधव, सुभाष पाटील, रमेश मोरे, चंद्रकांत भोसले, दिपक गौड, गिरीश शिंदे, सौरभ जौंदाळ, अक्षय मंडलिक, दिनेश साळुंखे, शुभम पिसाळ, राजरौनक शिंदे, शुभम शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी सतेज पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेत गेली पाच वर्षे प्रशासकाच्या आडून महायुतीची सत्ता आहे. आम्ही विरोधक आहोत त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारणं हे आमचं कर्तव्य आहे. जिल्ह्यात १० आमदार महायुतीचे असूनही जिल्ह्याला काय मिळालं ? महायुतीने कोल्हापूरला विकासापासून जाणीवपूर्वक भुकेलं ठेवलं हे वास्तव जनतेसमोर मांडले.

यावेळी पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब, सुबराव गवळी, कलकल मंडळ यांच्यासह प्रभागातील 11 तालीम मंडळांनी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीला पाठींबा जाहीर केला.

 

🤙 8080365706