कोल्हापूर: शैक्षणिक वर्ष 2025. 26 सालातील शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच शुभांगी कुंभार यांच्या शुभहस्ते तर सीमा बायोटेक तळसंदेचे संचालक विश्वास चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या (तळसंदे ग्रामपंचायत तळसंदे ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळेस महेश कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मन मेंदू व मनगट यामुळेच विद्यार्थी घडत असतो विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच खेळालाही जर वाव मिळाला तर मुले भविष्यात हेच विद्यार्थी चांगले खेळाडू बनतील व गावाचे नाव उज्वल करतील असे प्रतिपादन विश्वास चव्हाण यांनी केले .विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी कुंभार क्रीडा विभाग प्रमुख काळे सर सहाय्यक अविनाश कर्णिक व जयसिंग सूर्यवंशी सर व जिरगे , जगताप , मुळीक मॅडम तसेच सर्व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, डॉजबॉल, रस्सीखेच, धावणे स्पर्धा, फेकीच्या स्पर्धा, फनी गेम्स, संगीत खुर्ची, पोत्यात पाय घालून धावणे, लिंबू चमचा, तीन पायाची शर्यत, अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अविनाश कर्णिक यांनी केले तर आभार सूर्यवंशी सर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कुमारी सई खोत व प्रज्ञा कुंभार यांनी केले.
