कोल्हापूरात थंडीची लाट; पारा 12 डिग्रीपर्यंत खाली

कोल्हापूर : जिल्ह्याचा पारा १२ डिग्रीपर्यंत खाली आला आहे. आगामी आठ दिवस तापमान असेच राहणार असल्याने गारठा वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होत आहे. मध्यंतरी ढगाळ व पावसाळी हवामानामुळे एकदमच थंडी गायब झाली होती. त्यानंतर आता थंडी सुरू झाली आहे.किमान तापमान १२ डिग्री तर कमाल २८ डिग्रीपर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे .आहे. पाणवठ्याशेजारी गारठा अधिकशेती, तळे, विहिरी, नदीच्या शेजारी गारठा अधिक जाणवतो. येथे सकाळी व रात्री कमालीची थंडी जाणवते. या परिसरातून जाताना अंग गोठल्यासारखे वाटते. शेतीच्या कामावरही परिणामग्रामीण भागात पहाटे पाचपासून दिवस सुरू होतो. जनावरांसाठी वैरण आणणे, दूध काढून ते सकाळी साडेसहापर्यंत संस्थेत घालणे ही लगबग सुरू असते. थंडीमुळे या कामावर परिणाम झाला आहे. ऊसतोड मजूर, पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. सकाळी, सायंकाळी शेकोट्यांची धगग्रामीण भागात सकाळी व सायंकाळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतात. ऊसतोड मजूर तर उसाचा पाला पेटवून त्या धगीवर ऊस तोडून बांधतात. ज्येष्ठ नागरिकांना त्रासया थंडीचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना होत आहे

🤙 8080365706