कोल्हापुरात गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक ; 8 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : राजारामपुरी परिसरात असलेल्या प्रीआयएएसी ट्रेनिंग सेंटर येथे चारचाकी टेम्पो मधून गुटखा विक्री करण्यासाठी आलेल्या प्रशांत संतोष चव्हाण (वय 26) आणि हसन फारुख शेख (वय 29.दोघे राहाणा.भोने माळ,इचलकरंजी) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्या कडील चारचाकी टेंम्पोत असलेला 02 लाख 56 हजार 740/.रुरुपये किमंतीचा सुगंधी पान मसाला,तंबाखू तत्सम पदार्थ आणि गुन्हयांतील इतर मुद्देमाल असा एकूण 08 लाख 87 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना राजारामपुरीतील प्रीआयएएस सेंटर येथे गुटखा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी छापा टाकून कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राजारामपुरी येथील प्रीआयएएस सेंटर येथे सापळा लावून सायबर चौका कडुन आलेल्या चारचाकी टेंम्पोला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यात पांढऱ्या रंगाच्या अनेक पोत्यात वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा,पान मसाला पाकिटे आणि सुगंधी तंबाखूची पाकिटे मिळून आली.

यावेळी तपास पथकाने या दोघांकडे चौकशी केली असता त्यानी हा गुटखा कर्नाटकातून आणला असून त्याची कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी फिरुन विक्री करीत असल्याचे सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलिस अंमलदार वैभव पाटील,अरविंद पाटील,योगेश गोसावी,प्रदिप पाटील,संतोष बरगे ,विशाल खराडे,शिवानंद मठपती,सत्यजित तानूगडे आणि विशाल चौगूले यांनी केली.

🤙 8080365706