शिरोली येथे विवाहित महिलेची आत्महत्या

कुंभोज (विनोद शिंगे)
पुलाची शिरोली येथील सौ. स्वाती अनिल कदम या महिलेने भाडोत्री घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली की घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. अनिल कदम हे विलास नगर येथील चौगुले बिल्डिंग मध्ये भाड्याने रहायला आहेत.

ते बुधवारी दुपारी शिरोली औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपनीत कामावर गेले असता त्यांची पत्नी स्वाती कदम हिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.विनोद शिंगे कुंभोज

🤙 9921334545