कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागासाठी एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. अधिविभागाचा माजी विद्यार्थी (बॅच २०२१-२२) अजिंक्य नामदेव कदम याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत यश संपादन केले आहे. मार्च २०२५ मध्ये जाहीर झालेल्या निकालात अजिंक्यने हे यश मिळवले असून, त्याच्या या यशाबद्दल भौतिकशास्त्र अधिविभागातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.

सांगोला तालुक्यातील दहिवडी गावाचा रहिवासी असलेल्या अजिंक्यने कोणत्याही प्रकारच्या शिकवणी (क्लास) शिवाय, केवळ स्वतःच्या मेहनतीने आणि तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्याचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
या सत्कारप्रसंगी बोलताना भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी अजिंक्यचे मनपूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले, “अजिंक्यचे हे यश केवळ त्याच्या एकट्याचे नसून, ते त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वक्तशीरपणा, शिस्त आणि नैतिक मूल्यांचा आदर केला पाहिजे. हे गुणच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जातात.”