उबाठा गट शाखा प्रमुखांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

कोल्हापूर : उबाठा गटाचे पिंपळगाव बुद्रुक येथील शाखाप्रमुख बाळासो माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेला नवे बळ मिळाले असून, पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारेल.बाळासो माने यांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा उपयोग जनसेवेसाठी होईल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
यावेळी अजित पाटील, सरपंच बंडेराव सूर्यवंशी, रमेश कांबळे, सतीश सूर्यवंशी, गुंडा येरुडकर, बाबुराव येरुडकर आदी प्रमुख उपस्थित होते.

🤙 9921334545