‘काजीर्डा ते पडसाळी’ घाटरस्त्याच्या जोडणीसाठी आ.चंद्रदीप नरकेंची मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत बैठक

मुंबई : मंत्रालयात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे काजीर्डा ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडसाळी या नवीन घाट रस्त्याच्या जोडणी आणि या रस्त्यावरील मिसिंग लांबीचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात आमदार चंद्रदीप नरके यांची बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत बैठक झाली.

 

या बैठकीमध्ये काजीर्डा ते पडसाळी या दोन गावांमध्ये जोड रस्ता झाल्यास अत्यंत सोयीचे होईल, मात्र या रस्त्यावर साधारण तीन किलोमीटर पर्यंत मिसिंग लांबी आहे. या कामाचे सर्वेक्षण झाले असून त्याचा विस्तृत अहवाल ऑक्टोबर 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे, यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच सदर रस्त्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील 300 मीटर लांबीचा रस्ता वनविभागाच्या अंतर्गत आहे. या ठिकाणी रस्ते बांधणी करण्यासाठी वनविभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. या परवानग्यांसाठी संबंधित कन्सल्टंट नेमलेला आहे. परवानग्याचे काम त्वरित करून गेल्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. रस्त्याच्या संदर्भात सकारात्मक चर्चा बैठकीत झाली.

बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, संतोष शेलार मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग, एस एन राजभोज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण, अमोल ओखणेकर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी, चंद्रकांत आयरेकर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर, श्रुती नाईक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.

🤙 9921334545