कोल्हापूर : महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडा विभागातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार श्रीधर श्रीकांत निगडे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यासह प्रशिक्षक दिपक पाटील, पृथ्वीराज पाटील (कोपार्डे), कल्याणी पाटील (पाडळी खुर्द), वैष्णवी पाटील (पाडळी खुर्द) यांचा सत्कार सोहळा आमदार सतेज पाटील हस्ते पार पडला.
ग्रामीण भागातही रग्बी खेळ लोकप्रिय होत असून खेळाडूंचे करिअर घडत आहे. या खेळासाठी शासन स्तरावर सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करणार असे आमदार सतेज पाटील यांनी मत व्यक्त केले.
यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष संचालक विश्वास पाटील (आबाजी), बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, जि. प. मा. उपा. शशिकांत खोत, पोलीस उपाधीक्षक सुजितकुमार शिरसागर, रब्बी असोसिएशनचे अध्यक्ष अमर सासणे, यशवंत सहकारी बँकेचे चेअरमन महेश पाटील यांच्यासह नागदेववाडी पाडळी दोनवडे येथील नागरिक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.