आम्ही कोल्हापूरकर,भारतीय सेनेबरोबर : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : भारत देशाच्या समर्थनार्थ व भारत मातेच्या वीर सैनिकांच्या प्रोत्साहन आणि प्रेरणेसाठी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या नियोजना संदर्भात भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क या ठिकाणी बैठक घेतली.

या बैठकीत रॅलीचा मार्ग, रॅलीचे नियम यावर सविस्तर चर्चा केली. तसेच यामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये व आपल्या देशाच्या कोणत्याही प्रतिकाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
या तिरंगा पदयात्रेत देशभक्त म्हणून सर्व कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार मा. अमल महाडिक, मा. महेश जाधव, मा. विजय जाधव यांच्यासह कोल्हापूर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545