कोल्हापूर : मरळे (ता.शाहूवाडी) येथे नव्याने बांधलेल्या बौद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्ध तसेच बौद्धीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या बौद्ध विहाराचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),करंजफेण गावचे सरपंच नामदेव पवार,युवराज पाटील,युवराज सुतार,आनंदा पाटील,भगवान पाटील,सुरेश कांबळे,बडोपंत माळवी,आनंदा कांबळे,लक्ष्मण कांबळे,भाऊ कांबळे आदी मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.