कोल्हापूर : ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली.
कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधांपर्यंत जाऊन वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, प्रत्येक गावागावातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून त्यांना आवश्यक शासकीय मदत देणे अभिप्रेत आहे. यासाठी येत्या महिनाभरात प्रत्येक तालुक्यात त्या-त्या आमदारांना कृषी विभागाकडील सर्व योजनांची व सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती तातडीने देण्याचे निर्देश दिले.
शासकीय पदावर असताना आपला लोकांसाठी उपयोग व्हावा म्हणून प्रत्येक अधिकाऱ्याने काम केले पाहिजे. येत्या एक महिन्यात सर्व कृषी विभागाचा आढावा घेण्यात येणार असून त्यांनी याबाबत सर्व तयारी करावी.
बैठकीला दूरदृश्य प्रणाली द्वारे सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजेंद्र पाटील–यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.