कुंभोज (विनोद शिंगे)
नेज ता. हातकणंगले येथील बुद्ध विहारामध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक – गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) तसेच मा. सभापती प्रवीण यादव, मा. जि. प. सदस्य महेश चव्हाण, देवानंद कांबळे, सरपंच दिपाली गोंधळी, सदस्य यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

बुद्धपौर्णिमा एक खास दिवस असून, या दिवशी आपण बुद्धांच्या शिकवणींचा आदर करत आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहेत. आजच्या दिवशी आपण गावात तथाकत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना करून समाज्यांमध्ये चांगला संदेश पोहचवण्याचे काम केले आहे.
यावेळी बाबासाहेब शिंगे, उपसरपंच मनोज कांबळे, शुभम खोत, ज्योती नेजकर, हनीफा मुल्ला, ज्योती नेरले, सजाबाई कांबळे, रमेश घाडगे, विनोद कांबळे, संदीप कांबळे, पोलिस पाटील, पांडुरंग कुंभार, तर मान्यवर उपस्थित होते.
