‘संघर्षिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’चे हे कृषी सेवा केंद्र म्हणजे ग्रामीण भागात परिवर्तनाची सुरुवात : मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : मजरे कासारवाडा, (ता.राधानगरी) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या संघर्षिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन आरोग्यमंत्री,कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

                       

यावेळी आबिटकर म्हणाले, शेतीचे भविष्य आधुनिक तंत्रज्ञान आणि सशक्त व्यवस्थापनावर अवलंबून आहे. ‘संघर्षिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’चे हे कृषी सेवा केंद्र म्हणजे ग्रामीण भागात परिवर्तनाची सुरुवात आहे. महिलांनी पुढाकार घेऊन उभारलेला हा उपक्रम इतरांसाठी आदर्श ठरेल. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त बियाणे वा खते नव्हे, तर आत्मविश्वास, ज्ञान आणि दिशा मिळणार आहे. सरकारच्या वतीने अशा प्रेरणादायी प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा दिला जाईल.
या कार्यक्रमास प्रकल्प समन्वयक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई, माजी सभापती वंदनाताई जाधव, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, जेष्ठनेते शामराव भावके, अशोकराव फराकटे, सरपंच प्रल्हाद पाटील, अशोकराव वारके, विश्वनाथ तहसीलदार, प्रमोद तवणकर, प्रभाकर पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर महिला बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545