कोल्हापूर : पुण्यातील घे भरारी या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून युवा उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तीन दिवसीय घे भरारी प्रदर्शनाचं आयोजन हॉटेल पॅव्हेलियन येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या अध्यक्षा वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
पुण्यातील राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी घे भरारी हा फेसबुक ग्रुप निर्माण केला आहे या ग्रुपच्या माध्यमातून ऑफलाइन आणि ऑनलाईनच्या माध्यमातून छोट्या व्यवसायिकांना बळ देण्याचं काम सुरू केले आहे. या प्रदर्शनामध्ये हस्तनिर्मित आणि हस्तकलेच्या वस्तू, गृहसजावटीचे साहित्य, दागिने, अद्वितीय कलेक्शन, ज्वेलरी, साड्या तसेच ड्रेस मटेरियल, बॅग, फूड यासह अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या ग्रुपच्या वतीने मुंबई ठाणे, पुणे, बेंगलोर नाशिक कोल्हापूर सांगली यासारख्या शहरांमध्ये 80 पेक्षा अधिक ठिकाणी प्रदर्शने भरवली आहेत कोल्हापुरात यंदाचे हे तिसरे वर्ष आहे या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या तीन दिवस सुरू असलेल्या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन वैष्णवी महाडिक यांनी यावेळी केले.