मुंबई : काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100, असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.