कोल्हापूर:उचगाव येथे आप्पा वाइंगडे स्पोर्ट्स आयोजित खासदार व आमदार चषक 2025 भव्य डे नाईट फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामीण 23 एप्रिल ते 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहेत.या स्पर्धेचे संयोजक मा. जिल्हा परिषद सदस्य इरफान मणेर, पुंडलिक उर्फ अब्बा वाईंगडे, नामदेव वाईंगडे, उचगांव ग्राम पंचायत सदस्य तलहा मणेर आहेत.

या स्पर्धेमध्ये विजेत्या संघास 51 हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकास 31 हजार तर तृतीय क्रमांकास दहा हजार रुपयांचे बक्षीस आयोजित केले आहे.
भारतीय जनता पार्टी ,उचगाव पदाधिकारी, सभासद, नेते मंडळी व कार्यकर्ते आणि भागातील नागरिक यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
