स्नेह मेळावा अमित स्पिनिंग मिलचा… पंधरा वर्षांनी पुन्हा भेटले कामगार मित्र

कोल्हापूर :
आपण शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अनेक वेळा पाहिला असेल. पण एका कंपनीत एकत्र काम केलेल्या व कंपनी बंद होऊनही पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या कामगार व कर्मचारी यांचा स्नेह मिळावा कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात प्रथमताच पाहतोय.

 

याबाबत माहिती अशी की, गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर ११ एप्रिल १९९३ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे येथे अमित स्पिनिंग इंडस्ट्रीज या कंपनीची सुरुवात भरतभाई शहा यांनी केली. मालक,व्यवस्थापन, कर्मचारी यांची योग्य सांगड असल्याने व कंपनी शंभर टक्के निर्यातीचा धागा बनवणारी कंपनी म्हणून अल्पावधीत मोठ्या नावारुपाला आली होती.पण व्यवस्थित चालणाऱ्या या कंपनीचे शेअर्स सन २००७/०८ दरम्यान सीएलसी या कंपनीकडे हस्तांतरित झाले. व सन २०१० च्या दरम्यान काही कारणावास्तव ही कंपनी बंद पडली. कंपनी बंद झाल्यानंतर अनेक कामगार बेकार झाले होते. पण अमित स्पिनिंग मिल मध्ये घेतलेल्या ज्ञानाचा फायदा करून घेत हे कामगार पुन्हा दुसऱ्या ठिकाणी सेटल झाले. पण आयुष्यातील अनेक वर्ष एकत्र काम केलेल्या मित्रांना पुन्हा एकत्र येऊ अशी भावना निर्माण झाली होती .आणि गेल्या २६ जानेवारी रोजी काही मित्रांनी एकत्र येत या स्नेहसंमेलनाची आखणी करण्यास सुरुवात केली. बघता बघता पाचचे ते पन्नास मित्र एकत्र येऊन कंपनी वर्धापन दिनाचे औचित्य साधून ११ एप्रिल २०२५ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने आज कंपनीचे डायरेक्टर अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अमित परिवारांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. १५ ते २० वर्षांनी पुन्हा एकत्र आल्याने एक आनंदाचे वातावरण पसरले होते.मित्र गळाभेट घेत भावुक झाले होते. तर अनेकांना अश्रू अनावर झाले होते .कार्यक्रमाची सुरुवात ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रार्थनेने व दीप प्रजनन करून करण्यात आली. यानंतर कै.भयतभाई शहा यांच्या सह कंपनीमध्ये मयत झालेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मनोगत व्यक्त करताना अमितभाई शहा यांनी कंपनी व येथील कामगार कर्मचारी यांचे आभार मानत भरतभाई शहा आणि परिवारावर आपण जे प्रेम व्यक्त केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो, अमित स्पिनिंग बद्दल बोलताना माझे मन भरुन येते. या कंपनीमध्ये जे झाले ते व्हायला नको होते, पण दुर्दैवाने ते झाले. याची मला खंत आहे. आपण भरतभाई शहा यांचे आचार विचार जोपासत हा कार्यक्रम घेतला यांचा मला साथ अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी मधुकर कामत, रामानुज शर्मा, सुनील कोळेकर, राकेश शहा, पवन पाटील, सहदेव जाधव, महादेव जानकर,नासिर जमादार, आनंदा पेंडसे, गौतम कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.दुपारच्या सत्रात मनोरंजन,व कामगारांना सन्मान चिन्ह व बॅग भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी महेश कांदेकर, राजाराम भिवसे, अशोक मजगे, रविंद्र दावणे, अनिल बिरांजे, प्रकाश पाटील यांच्यासह चारशे लोक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अँकरिंग अक्षय डोंगरे, प्रास्ताविक व स्वागत प्रशांत पितालिया तर आभार अजित पाटील यांनी मानले . पुन्हा भेटण्याचे अभिवचन घेऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.