कुंभोज (विनोद शिंगे)
भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या लाभार्थ्यांना 2015 च्या शासन निर्णयानुसार जातीचे दाखले मिळवून देण्याचे काम सदर संघटना मार्फत सुरू आहे.
त्याच अनुषंगाने कुंभोज येथील गोसावी समाज हा शासकीय दाखल्यामुळे वंचित आहे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखले नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.. तालुका संयोजक संजय नंदीवाले यांचा हातकणंगले शिरोळ दौरा सुरू असताना ते कुंभोज गावी आले असता त्यांना गोसावी समाजाची कोणतीच दाखले नसल्याचे निदर्शनास आले.. तेव्हा त्यांनी ताबडतोब तहसीलदार सुशील बेलेकर साहेब यांच्याशी बैठक करून 2015 शासन निर्णयानुसार सदर दाखले मिळणे बाबत सहकार्य करावे अशी विनंती केली.. तेव्हा तहसीलदार साहेबांनी चांगले सहकार्य केले व संजय गांधी निराधार समितीचे सदस्य संदेश भोसले यांचेही सहकार्य लाभले..
कुंभोज ग्राम महसूल अधिकारी जयवंत पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व संगायो समिती सदस्य संदेश भोसले व ग्रा.पं. सदस्य अजित देवमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोसावी समाजाला जातप्रमाण पत्र वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र भटके विमुक्त विकास परिषद हातकणंगले चे संयोजक संजय नंदीवाले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.