मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रॅक्टिस करत असलेल्या वरिष्ठ वकील व वकील यांचे समवेत मुंबई येथे स्नेह मेळावा संपन्न झाला.
यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांची राज्याचा आरोग्य व कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या स्नेहमेळाव्या प्रसंगी सर्व वरिष्ठ वकील मंडळी यांचे संगीत कोल्हापूर येथील जुन्या आठवणी तसेच मुंबईतील त्यांच्या कारकिर्दीची कशा पद्धतीने सुरुवात झाली या सर्व बाबींवर चर्चा झाली.
यावेळी सिनियर ॲड.अशोक मुंडरगी, सिनियर ॲड.अनिल साखरे, सिनियर ॲड.संजीव कदम, सिनियर ॲड.नरेंद्र बांदिवडेकर, ॲड.निरंजन मुंडरगी, ॲड.श्रीकृष्ण गंबावले, ॲड.प्रदीप दळवी, ॲड.संग्राम यादव, ॲड.प्रशांत भावके यांच्यासह प्रमुख मान्यवर व वकील उपस्थित होते.