उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातर्फे ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार’ जाहीर..!

मुंबई – शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील प्रथम ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार’ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायासाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल समस्त वारकरी बांधवांच्या उपस्थितीत या पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गौरविण्यात येणार आहे.

 

 

संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या वैकुंठ गमन वर्षपूर्ती सोहळ्यादिनी हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज वैकुंठगमन स्थान, श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी 16 मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.