आ. राहुल आवाडेंच्या हस्ते आदिवासी फासे पारधी समाज हॉल स्लॅब शुभारंभ

कोल्हापूर : माजी मंत्री माजी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या आदिवासी फासे पारधी समाज हॉल स्लॅबच्या शुभारंभाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

या सोहळ्यास आदिवासी फासे पारधी समाज बहुउद्देशीय संस्था, इचलकरंजी अध्यक्ष मोहन शिवराम काळे, अभिजीत तळकर (सामाजिक कार्यकर्ते), राजू बोंद्रे (माजी शिक्षण सभापती, इ.न.पा.), (M.K. Group, आवाडे समर्थक, इचलकरंजी) तसेच गोपाळ काळे, मल्लू चव्हाण, सुभाष चव्हाण, गणेश काळे, . विलास चव्हाण, . सोमनाथ काळे, . प्रकाश काळे, राहूल चव्हाण, महादेव चव्हाण, सुनिल काळे, शंकर चव्हाण, दत्ता चव्हाण,जानू काळे आदी मान्यवर उपस्थित होते.