कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना मैदानावर संपन्न होणार “राजेश चषक”

कोल्हापूर – शांद फौंडेशन आयोजित “राजेश चषक” टी 20 शाहूपुरी जिमखाना मैदानावर संपन्न होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत पुष्कराज क्षीरसागर यांनी दिली. यावेळी पुष्कराज क्षीरसागर म्हणाले, शांद फौंडेशन आयोजित “राजेश चषक” टी 20 लेदर बॉल खुली क्रिकेट स्पर्धा 2025 दि. 10 मार्च पासून ते दि. 16 मार्च अखेर शाहूपुरी जिमखाना मैदानावर संपन्न होणार आहेत. स्पर्धेत एकूण 8 संघाचा सहभाग असून सोलापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी जिल्हा संघासह कोल्हापूरच्या 4 संघाचा सहभाग असणार आहे.

 

 

स्पर्धेचे उदघाटन दि. 10 मार्च रोजी सकाळी 09 वाजता शाहूपुरी जिमखाना मैदानावर मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम विजेता संघास रोख रु. 75,000/- आणि राजेश चषक ट्रॉफी, दिली जाणार आहे. तर उपविजेता संघास रोख रु. 51,000/- आणि राजेश चषक ट्रॉफी देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू “मालिकावीर” रोख रु. 5,000/- उत्कृष्ट “मालिका” फलंदाज रोख रु. 3,000/- “मालिका” गोलंदाज रोख रु. 3,000/- बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूस “सामनावीर” रोख रु.1,000/- बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाडूंना टी शर्ट, कीट देणेत येईल.

स्पर्धेतील अंतिम सामना शाहूपुरी जिमखाना मैदानावर दि. 16 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. सामन्यानंतर सायं. 5 वाजता आमदार राजेश क्षीरसागर, अध्यक्ष राज्य नियोजन महामंडळ महाराष्ट्र यांच्या आणि मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस समारंभ होईल. सदर क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांचे सहकार्य आणि आमदार राजेश क्षीरसागर  व क्षीरसागर परिवार यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यातून संपन्न होणार आहेत.

या पत्रकार परिषदेला अनिल शिंदे, मधु बामणे, योगेश सूर्यवंशी मुकुंद यादव, प्रकाश मांजगावकर, प्रतीक जामसाडेकर, प्रशांत मिराशी, रणजीत इंदुरकर आदी उपस्थित होते.

🤙 9921334545